
माळीनगर, ता. माळशिरस (जि. सोलापूर) – संग्रामनगर माळीनगर येथील 12 वर्षीय सागर रवि कोळी हा मुलगा दिनांक 14 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाला आहे. संबंधित प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात व्यक्तीने मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.फिर्यादी रवि सुरेश कोळी (वय 36, व्यवसाय- व्यापार, जात- हिंदू डोंबार) हे आपल्या पत्नी सोजल, आई हौसाबाई आणि तीन मुलांसह संग्रामनगर माळीनगर येथे राहतात. खेळणी विक्रीचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा सागर हा शाळेत जात नसून घरीच असतो.14 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता रवि कोळी हे पत्नी व लहान मुलीसमवेत मोटारसायकलवरून अकलूज येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांनी मटण शिजवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा मुलगा सागर घरासमोर खेळत होता. मात्र, काही वेळाने तो गल्लीत खेळण्यासाठी गेला आणि नंतर घरी परतला नाही.सागर बराच वेळ घरी न आल्याने आई-वडिलांनी तातडीने परिसरात शोध घेतला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने माळीनगर भाग, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु, कुठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय बळावला. अखेर 15 मार्च 2025 रोजी रवि कोळी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.बेपत्ता झालेल्या सागर कोळीचे वर्णन असे आहे –नाव – सागर रवि कोळीवय – 12 वर्षे 11 महिने 20 दिवसराहणार – संग्रामनगर, माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूररंग – गोराउंची – 4 फूटशारीरिक बांधा – सडपातळवेषभूषा – पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँटशिक्षण – इयत्ता 3रीभाषा – मराठीपोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून, स्थानिकांकडून माहिती गोळा केली जात आहे.अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सागर कोळीबाबत कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.बालक बेपत्ता होण्याच्या घटना गंभीर असल्याने या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. अज्ञात इसमाने कोणत्या उद्देशाने मुलाला पळवले, याचा तपास सुरू आहे. अपहरण हे कोणत्याही प्रकारच्या गैरकायदेशीर उद्देशाने झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.








