
बारामती शहर पोलीस स्टेशनने गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार जेजुरीहून सांगोला दिशेने नेण्यात येत असलेली चार गाय कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना 29/11/2025 रोजी सकाळी 07:30 वाजता धरली. पोलीसांनी वाहन व गायी जप्त करून महाराष्ट्र गोवंश संवर्धन अधिनियम 2015, प्रतिबंधक अधिनियम 1960 व अन्य संबंधित कलमांतर्गत संघटित गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस अधीक्षक श्री गिल यांच्या आदेशानुसार कलम 111 नुसार संघटित गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 441/2025 म्हणून नोंद घेतली आहे. प्राथमिक तपासात, MH-12-YB-4080 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून चार सुदृढ दुभत्या गायी अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने कोंबून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्या. गायांची एकूण अंदाजे किंमत ₹1,45,000/- अशी सांगण्यात आली आहे. पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या निर्देशानुसार पो.शि. अक्षय सिताप, पो.शि. गिरीष नेवसे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश माने यांनी तातडीने कारवाई केली. प्रथम दखलीनंतर तपासला असता महाराष्ट्र गोवंश संवर्धन अधिनियम 2015 चे कलम 5, 5A, 9, 11 व प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(a)(b)(m)(e)(h) तसेच मोटार वाहन अधिनियमाचे कलम 66, 192, 125E आणि भारतीय न्याय संहिता कलम 291, 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस म्हणतात की गोवंशाची अवैध वाहतुकीचे प्रकार वाढत असल्याने गुन्हेगारी साखळी ओळखून लवकरात लवकर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. आरोपींच्या विरोधात पुढील तपास सुरू असून आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील चौकशी आणि प्रकरणातील मुख्य आरोपी चालक सलमान इनामदार( रा. कोळविरे, ता. पुरंदर),क्लिनर- चंद्रकांत बर्डे (रा. जेजुरी) तसेच दलाल दत्ता पवार व गाय विकणारे शेतकरी यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक श्री.चिवडशेट्टी म्हणाले,गो
वंश संरक्षण कायद्यांचे उल्लंघन आणि प्राणी क्रूरतेच्या प्रकरणांवर शून्य सहनशीलता आहे. गुप्त तक्रारीवरून मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ कारवाई करून प्राणी व वाहन जप्त केले गेले आहेत; तपासादरम्यान दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
बारामती शहर पोलीस हे स्थानिक कायदा व सुव्यवस्था, नागरी सुरक्षा आणि प्राणी संरक्षणाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहेत. अवैध वाहतूक, प्राणी अत्याचार आणि संघटित गुन्हे यांच्याबाबत तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते. नागरिकांना शंका वा गुप्त माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन आहे.
ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.गिल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.







