
बारामती तालुक्याचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर’ करण्यासाठी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. सचिन दिनकर साबळे, प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती मोर्चा भाजपा आणि चेअरमन मूलनिवासी बारामती तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्जाद्वारे या बाबत विनंती केली आहे.
सचिन साबळे यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्र आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांची कर्मभूमी म्हणून बारामतीचे नाव बदलणे योग्य ठरेल. बारामती हे नाव इतिहासात बारभाईच्या कारस्थानाशी जोडले गेले असल्याने, या नावाला पर्याय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने तालुक्याचे नाव ठेवणे महाराष्ट्राच्या सामाजिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून गरजेचे आहे. त्यांनी यामुळे आंबेडकरी विचारसरणीला व महाराष्ट्रातील युती सरकारच्या धोरणांना पाठिंबा मिळेल असेही नमूद केले.

सचिन साबळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी जे कार्य केले आहे, त्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी बारामती तालुक्याचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर’ करणे आवश्यक आहे.”बारामतीतील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या मागणीला पाठिंबा देत असून, स्थानिक प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मूलनिवासी बारामती तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती ही एक सामाजिक संस्था असून, स्थानिक विकास व सामाजिक न्यायासाठी काम करते. तसेच, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती मोर्चा भाजपा राज्यातील अनुसूचित जातींच्या हक्कासाठी कार्यरत आहे.
सचिन दिनकर साबळे
प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती मोर्चा भाजपा चेअरमन, मूलनिवासी बारामती तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.







