लग्नाची वरात, पोलीस स्टेशनचे दारात..!!

बारामती तालुक्यातील माळेगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंतर्गत येणारे मौजे माळेगांव खुर्द या गावात आज दिनांक 20/04/2025 रोजी सायं 04.00 वा.चे सुमारास भारतीय संसदेने भारत देशातील सर्व जाती धर्मातील पुरुषांकरिता कमीत कमी 21 वर्षे, आणि मुलींसाठी कमीत कमी 18 वर्षे वयोमर्यादा ठरवून दिलेली असताना देखील एका विशिष्ट समाजातील नातेवाईकांनी एकत्र येऊन नवरी मुलीचे वय 13 वर्ष 8 महिने असलेबाबत नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील माळेगांव खुर्द गावचे ग्रामपंचायत मालकीचे यशवंत सभागृह येथे ग्राम पंचायत कार्यालयास कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर लग्न लावून दिलेबाबतची माहिती गुप्त बातमीदार यांचे कडून माळेगांव पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक सदर घटनास्थळी रवाना करून त्यांना मिळाले बातमीचे अनुषंगाने सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेमुळे पोलीस पथकाने मिळाले बातमीचे अनुषंगाने सत्यता पडताळून नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री केले नंतर एकंदरीत सदर घडलेली घटना ही बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असलेने संबंधित आरोपींना माळेगांव पोलीस ठाणे येथे चौकशी कामी आणण्यात आलेले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने मौजे माळेगांव खुर्द या गावचे ग्रामपंचायत अधिकारी श्री.इम्तियाज राजमहंमद इनामदार यांनी शासनामार्फत फिर्याद दिल्याने माळेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 97/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) सह बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9, 10 प्रमाणे नवरी मुलीचे वडील 1) राजेश अजगर भोसले नवरीची आई 2) सौ.वारणा राजेश भोसले दोघेही रा.माळेगाव खुर्द ता.बारामती जि.पुणे नवरदेव 3) राहुल भानुदास शिंदे, नवरदेवाचे वडील 4) भानुदास मायाजी शिंदे व नवरदेवाची आई 5) रुपाली भानुदास शिंदे अ.क्र.3 ते 5 सर्व रा. पिपरी ता खंडाळा जि सातारा यांचे विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पो.हवा.1901 मोहोळे यांनी दाखल करून पुढील तपास पो.हवा. 2213 सय्यद यांचेकडे दिलेला आहे. *चौकट*कोणताही कायदा मंजूर करण्यापूर्वी ते विधेयक तयार करण्यासाठी शासन त्याचे फायदे आणि तोटे हे खात्री केलेनंतर त्या नियमावली सर्व समाजाच्या दृष्टीने लागू करणे आवश्यक असल्यासच भारतीय संसद कोणताही कायदा मंजूर करून त्या नियमावली प्रमाणे कार्यवाही करण्याचे काम शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडे दिले जाते, त्या मुळे या सर्व बाबींचा विचार करून सर्व नागरिकांनी आपले वर्तन हे सर्व कायदेशीर नियमात राहील यासाठी प्रयत्न करावा, जेणे करून कोणत्याही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार नाही. तसेच जो कोणीही कायदा मोडेल त्यांचेवर कडक कायदेशीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन माळेगांव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि श्री.सचिन लोखंडे यांनी केलेले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!