बार्शीत गोवंश मांस विक्री प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल..!!

मालवंडी येथे पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत, दुसरा फरार..

बार्शी तालुका पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे मालवंडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे केलेल्या कारवाईत गोवंश जातीचे मांस विक्री प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.

दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 8:00 वाजण्याच्या सुमारास प्राणीमित्र संघटनेचे सदस्य व फिर्यादी वैभव नागेश काथवटे (वय 26, व्यवसाय – मजुरी व प्राणीमित्र, रा. खाटीक गल्ली, बार्शी) यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मालवंडी गावात दोन इसम गोवंश जातीचे मांस विक्री करत आहेत.

सदर माहिती तातडीने बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे यांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस हवालदार कावळे (1822), पोलीस नाईक शेलार (1995), तसेच होमगार्ड बोटे (2226) यांना घटनास्थळी पाठवण्यात आले.

मालवंडी गावातील धानोरे रोडवर पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी सापळा रचला असता, दोन इसम पांढऱ्या रंगाची गोणी आणि पिशवी घेऊन बसलेले आढळले. पोलिसांनी एका व्यक्तीस जागीच ताब्यात घेतले, तर दुसरा इसम घटनास्थळावरून पळून गेला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने आपले नाव सर्फराज खलील कुरेशी (वय 32, रा. पापनस, ता. माढा, जि. सोलापूर) असे सांगितले. फरार झालेल्या व्यक्तीचे नाव शहानवाज खलील कुरेशी (रा. पापनस, ता. माढा, जि. सोलापूर) असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी पंचासमक्ष संशयितांकडील गोणी व पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंश जातीचे अंदाजे 18 किलो वजनाचे मांस, एक तराजू काटा, एक किलो व अर्धा किलो वजनाची मापे, चाकू, सत्तूर, लाकडी कुंदा, तसेच एक हिरो होंडा फॅशन प्रो मोटारसायकल (क्रमांक MH 45 M 4240) मिळून आली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ₹18,840 असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संशयितांनी गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी आणले असल्याचे कबूल केले. त्यामुळे बार्शी तालुका पोलिसांनी सर्फराज कुरेशी व शहानवाज कुरेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325, 3(5), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 6, 9 आणि महाराष्ट्र छळवाद प्रतिबंधक अधिनियम 1999 चे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी सर्फराज कुरेशीला ताब्यात घेतले असून, फरार असलेल्या शहानवाज कुरेशीचा शोध सुरू आहे. जप्त केलेले मांस सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागामार्फत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

बार्शी तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, फरार आरोपी लवकरच गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे

Leave a Comment

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal