
बारामती, दि. 27 मे 2025 – बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकांच्या शोधासाठी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीत, पालखी महामार्गाजवळील काटेवस्ती काटेवाडी गावाजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कॅनल किंवा पावसाच्या पुराच्या पाण्यात आढळून आला आहे. मृतदेहाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून, चेहरा गोलसर आणि डोक्यावर केस नसलेला आहे. मृतदेहाची स्थिती पूर्णपणे सडलेली असून, डाव्या हाताच्या मनगटावर “आई,” “ताई,” किंवा “माई” असे गोंदलेले दिसत आहे. सदर मृतदेह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय बारामती येथील शवगृहात ठेवण्यात आला असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमएलसी क्रमांक 1336/2025 अंतर्गत मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी सांगितले, “सदर अनोळखी मृतदेहाचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. मृतकाच्या नातेवाईक किंवा परिचित असलेल्या कोणालाही आमच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करतो. त्यांना आवश्यक ती मदत आणि माहिती देण्यात येईल.
”बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून सर्व माध्यमांमार्फत मृतदेहाच्या ओळखीसाठी फोटो आणि माहिती प्रसिद्ध केली जात आहे. कोणत्याही माहितीकरिता खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा:
संपर्क: बारामती तालुका पोलीस स्टेशन दूरध्वनी: 02112-223433 पोलीस निरीक्षक व्ही.आर. पाटील – 9823751199 पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत – 7757813752 ईमेल: pibaramatitaluka.pnr@mahapolice.gov.in
बारामती पोलीस प्रशासन सर्व नागरिकांना विनंती करते की, मृतकाच्या नातेवाईकांच्या शोधासाठी आपली मदत करावी आणि कोणतीही माहिती असल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
बारामती तालुका पोलीस स्टेशन
आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.







